जीवनातला आनंद घेता घेता आपण छोट्या तलावातून महासागराच्या लाटांवर कधी हेलकावे घ्यायला लागतो ते आपलं आपल्यालाच कळत नाही. जीवनाच्या या धावपळीत आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. मग कधीतरी अचानक आपल्याला हृदयरोग असल्याचं कळतं. हृदय तर कायम धडधडत असतं. पण हे ऐकताच आपला मनमेंदू ही विषण्ण बनत जातो. सर्वच बाजूंनी आपण आणि आपले नातेवाईक समुद्राच्या लाटांवरून रस्त्यावर येतो. जीवनमृत्यूच्या या सीमारेषेवर डॉक्टर देवदूत भासायला लागतात. अनेक बाजूने अनेक सल्ले मिळू लागतात. आजारी माणसाच्या मनात भीतीचे काहूर गडद होऊ लागते.
मी स्वतः सप्टेंबर २०१९ मधे या सर्वातून गेलो आहे. आपल्याला हृदयरोग होईल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यामुळे अचानक बायपास सर्जरी करायची ऐकल्यावर क्षणभर पायाखालची जमीनच सरकली. परंतु अशावेळी डॉक्टर स्वप्नील कर्णे यांची नियुक्ती माझ्या सर्जरीसाठी झाली. ठरल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता ते मला भेटायला आले. त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व पाहून माझी सर्व भीती, शंका विरघळून गेल्या. त्यांना पाहताच प्रचंड विश्वास वाटावा असंच हे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाच मिनिटातच माझ्यातला आत्मविश्वास अधिक बळकट केला. मग मी अतिशय सहजतेने त्या सर्जरीला सामोरा गेलो आणि सहा महिन्यात चार चाकी ड्रायव्हिंग करत अर्धा महाराष्ट्र पालथा घालून आलो. डॉक्टर स्वप्नील कर्णे हे निष्णात सर्जन तर आहेतच, परंतु त्यांच्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीचा आजार पळवून लावण्याची क्षमता आहे. पेशंटचा आत्मविश्वास द्विगुणित करण्यात त्यांचा हातखंडा आहे. अद्ययावत वैद्यकीय ज्ञान तर आहेच परंतु ते परिपूर्ण आहे. डॉक्टरकडे स्वतःचा एक आत्मविश्वास असावा लागतो. तो त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात आहे. अतिशय व्यस्त असुनही सर्जरीनंतर वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन लाभते.
हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर डॉक्टर स्वप्नील कर्णे हे देवदूतच आहेत असे माझे ठाम मत आहे. त्यांच्या कार्यासाठी माझ्या लाख लाख शुभेच्छा!
